थंडरबर्ड ह्या विरोप क्लायंटचा आपल्या गूगल कॆलेंडरशी दुतर्फा ताळमेळ साधणे आता सहज शक्य आहे. ही माहिती मूळ इंग्रजीतून आणि सचित्र इथे पाहा. त्याचाच मराठीत सारांश खाली देत आहे.
यासाठी आवश्यक गोष्टी:
- गूगल कॆलेंडर
- थंडरबर्ड : सर्वोत्तम मुक्तस्रोत विरोप (इ-मेल ) क्लायंट
- लाईट्निंग : थंडरबर्ड कॆलेंडर ऎड-ऒन
- प्रोवायडर फॊर गूगल कॆलेंडर ऎड-ऒन फॊर थंडरबर्ड
कृती :
१)लाईट्निंग व प्रोवायडर ही दोन थंडरबर्ड ऎड-ऒनस् वरील दुव्यांवरून डाऊनलोड करा व इन्स्टॊल करा. हे करण्यासाठी
- डाऊनलोड पृष्ठावरील डाऊनलोड दुव्यावर उजवी टिचकी मारा व ते एक्स्टेन्शन आपल्या संगणावर 'सेव्ह' करा.
- थंडरबर्ड सुरू करा, त्यात Tools -> Add-ons ला जा.
- त्यात खाली डावीकडे असलेल्या 'Install...' बटनावर टिचकी मारा व वर 'सेव्ह' केलेल्या दोन्ही ऎड-ऒन फाईल्स् (xpi एक्स्टेन्शन असलेल्या) इन्स्टॊल करा.
Tools->Options->Lightning->Timezone tab
इथे जाऊन ती सेट करा.
२)आता तुमच्या गूगल कॆलेंडरला लॊग-इन करा. तिथे वर उजवीकडे असलेल्या 'Settings' वर टिचकी मारा.
३)'Calendar settings' ला जा व तुम्हाला हवे ते कॆलेंडर निवडा (एकाहून अधिक असल्यास).
४)'Calendar settings' मध्ये 'Private Address' च्या नारंगी रंगाच्या XML बटनावर टिचकी मारा.
५)नव्या पॊप-अप खिडकीतील URLवर उजवी टिचकी मारून त्यास क्लिपबोर्डवर डकवा/उतरून घ्या.
६)पुन्हा थंडरबर्डकडे या. त्यात खाली डावीकडे असलेल्या 'Calendars' टॆबवर टिचकी मारा व मग 'New...' बटनावर टिचकी मारा.
७)आलेल्या नव्या खिडकीत “On the Network” निवडा आणि 'Next' वर टिचकी मारा.
८)पुढील खिडकीत “Google Calendar” निवडा व 'Location' इन्पुट खोक्यात वर (५)मध्ये क्लिपबोर्डवर डकवलेला URL पत्ता पेस्ट करा व 'Next'वर टिचकी मारा.
९)पुढच्या खिडखीत तुमच्या या नव्या कॆलेंडरला तुमच्या पसंतीचे नाव व रंग द्या. 'Finish'वरा टिचकी मारा.
१०)आता आलेल्या “Google Calendar Login” खिडकीत तुमचा गूगल कॆलेंडर कूटशब्द (पासवर्ड) द्या व ( ऐच्छिक) पासवर्ड मॆनेजरला तो लक्षात ठेवण्याची मुभा द्या.
हुश्श. झालं. तुमच्या गूगल कॆलेंडरमधील इव्हेन्टस् थंडरबर्डमध्ये आलेले दिसतील. थंडरबर्डमध्ये एखादा नवा इव्हेन्ट घालून मग तुमच्या जालभ्रमकाचे गूगल कॆलेंडर पान ताजेतवाने करा. नवा इव्हेन्ट गूगल कॆलेंडरमध्ये आलेला दिसेल. त्याचप्रमाणे गूगल कॆलेंडरमध्ये नवा इव्हेन्ट नोंदवल्यास वा आधीचा कोणताही इव्हेन्ट बदलल्यास तो थंडरबर्डमध्ये दिसेल --> दुतर्फा ताळमेळ !
This entry was posted
on Wednesday, October 03, 2007
at Wednesday, October 03, 2007
and is filed under
Google Calendar,
Provider,
synchronisation,
Thunderbird
. You can follow any responses to this entry through the
comments feed
.
