काल सकाळी एका मराठी वृत्तवाहिनीवर (Z २४ तास किंवा IBN लोकमत, नक्की आठवत नाही.) विंदांच्या मृत्यूची दु:खद बातमी ऐकत होतो. बातमी देत असता निवेदिकेने म्हटले, "वांद्र्याच्या इस्पितळात सध्या त्यांच्या मृत्यू झाला आहे...". मी खुर्चीतून पडायचा तेव्हढा बाकी राहिलो. "सध्या" ??!!!! म्हणजे थोड्या वेळाने ते पूर्ववत जिवंत होऊन बसणार होते की काय? त्या दु:खद वातावरणातही आम्हा सार्यांच्या तोंडून हसू फुटल्याशिवाय राहिले नाही. माय मराठीचे अजून किती धिंडवडे काढलेले पाहावे लागणार आहेत देवास ठाऊक. :(
This entry was posted
on Monday, March 15, 2010
at Monday, March 15, 2010
and is filed under
बातमी,
मराठी
. You can follow any responses to this entry through the
comments feed
.
