"पोएट्स अन्डर प्रेशर" हा काव्यसमीक्षात्मक लेख आज वाचनात आला. चिडियोक टिचबोर्न ह्या कवीला राणी एलिझाबेथच्या विरुद्ध कट केल्याच्या आरोपाखाली अतिशय यातनामय देहदंड देण्यात आला. मरण्याच्या काही दिवस आधी त्याने तुरुंगात स्वत:वर एक शोकगीत लिहिले. त्या उत्कृष्ट कवितेचे, व स्वत: राणी एलिझाबेथने लिहिलेल्या "व्हेन आय वॉझ फेअर ऍन्ड यन्ग" ह्या कवितेचे रॉबर्ट पिन्स्की (स्लेट ह्या जालपत्राच्या काव्य-विभागाचा संपादक) ह्याने त्या लेखात थोडक्यात रसग्रहण केले आहे.
त्याचे रसग्रहण उत्तम आहेच, पण मला त्याहून अधिक आवडली ती प्रतिसादांमधून घडलेली मार्मिक व उद्बोधक चर्चा. वाचकांनी आपल्या टिप्पण्यांतून माहिती पुरवली आहेच, तसेच त्या कवितांकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले आहे, चर्चा केली आहे, त्यांतील सौंदर्यस्थाने उलगडून दाखवली आहेत. स्वत: पिन्स्कीनेही ह्या चर्चेत भाग घेतला आहे.संपूर्ण चर्चा अतिशय वाचनीय झाली आहे.
मराठी जालविश्वात गेल्या काही वर्षांपासून विपुल साहित्य-लेखन होत आहे. "वा"/"आवडली"/"आवडली नाही" ह्या त्रोटक व प्रातिनिधिक अभिप्रायांच्या पुढे जाऊन अशा स्वरूपाच्या विस्तृत व विधायक चर्चा इथेही व्हाव्यात असे वाटते.

This entry was posted
on Wednesday, January 26, 2011
at Wednesday, January 26, 2011
. You can follow any responses to this entry through the
comments feed
.