आपलं म्हणणं खरं ठरलेलं पाहून कोणाला आनंद होणार नाही? तरीही कधी कधी आपण खोटं पडावं असं फार फार वाटतं. वानगीदाखल मी सचिन तेंडुलकरविषयी
इथे व
इथे लिहिलं आहे ते घ्या. निदान विश्व-चषकात तरी सचिनने माझे शब्द माझ्या घशात घालावे अशी इच्छा होती. पण तसं होणं नियतीस मंजूर नव्हतं. पुन्हा एकदा उमर खय्यामच्या शब्दांचा यथार्थतेची प्रचीती आली :
"The Moving Finger writes; and, having writ,
Moves on: nor all your Piety nor Wit
Shall lure it back to cancel half a Line,
Nor all your Tears wash out a Word of it"
निर्दय काळाने सचिनच्या कारकीर्दीची भैरवी कधीच गायली आहे. ती त्याच्या कानापर्यंत केव्हा पोहोचते ते पाहूया.