Thursday, September 28, 2006
आरंभशूरता
मिलिंदने (तो मी नव्हेच !)'पुस्तकनिष्ठांची मांदियाळी' च्या खेळात मला खो दिला त्याला बरेच दिवस होऊन गेले. लिहायला जमेल की नाही ह्या भीतीपायी आज लिहू, उद्या लिहू अशी चालढकल करत राहिलो. आजही मी त्या खेळातील प्रश्नांची उत्तरं देणार नाही आहे. त्यांची जुळवाजुळव अजून चालू आहे. मूळ मुद्दा वेगळाच आहे. गेली अडिच-तीन वर्षं मी हौशी पद्यलेखन करीत असलो तरी गद्यात नीट लिहिता येईल हा आत्मविश्वास वाटत नव्हता. आजही वाटत नाही. आणि जे काम आपल्याला जमणार नाही असं वाटतं ते टाळणं ही माणसाची प्रवृत्ती आहे. पण दिवसेंदिवस ह्या भ्याडपणाची मला अधिकाधिक लाज वाटू लागली अन् शेवटी ही गद्य अनियतकालिक जालनिशी सुरू केली. वाटलं, एकदा सुरू केल्यावर हळूहळू जमू लागेल. लेखनाची उत्स्फूर्त उर्मी असो वा नसो, कर्तव्यभावनेने, लाजेकाजेस्तव काहीतरी लिहिलं जाईल. म्हणून हा ब्लॊगप्रपंच. ही आरंभशूरता पुढे किती काळ टिकेल ठाऊक नाही. कशाबद्दल लिहायचं ते सुचत नाही. कोणी वाचेल ह्याची शाश्वती नाही. जाऊ दे, उद्याची काळजी करून आजचा दिवस का बिघडवावा ? "कशाला उद्याची बाऽऽऽत? बघ सरून चालली रात ! "
Subscribe to:
Post Comments (Atom)
नाव तर झकासच आहे या जालनिशीचं! :))
ReplyDeletechan
ReplyDeleteत्यात काय, मनात येईल तेव्हा लिहायचं.
ReplyDeleteतुमचं पद्यलेखन इतकं छान आहे तर गद्यलेखन सुद्धा जमेल की.
-मिलिंद (तो मीच!)
maast, gadya lekhanahee aavadale. manogatavar aapaN phakt pady lihita kaa?
ReplyDelete