"They (Muslims) must have the first claim on resources."
पुन्हा एकदा आपण हिंदू आपल्याच देशात दुय्यम नागरिक झालो आहोत. अल्पसंख्यांकांना (पक्षी मुसलमानांना) प्राधान्य देण्यात येत आहे, येणार आहे - देशाची साधन-संपत्ती, शिक्षण, रोजकार, संधी - प्रत्येक ठिकाणी. कालपर्यंत आपल्यापैकी कोणीही हे सत्य जर जाहीरपणे बोलला असता तर निधर्मवाद्यांनी केव्हढा गदारोळ केला असता. हे बोलणाऱ्याला डाव्यांनी आणि कॉंग्रेसवाल्यांनी ताबडतोब "धर्मांध हिंदू, फॅसिस्ट, बुरसटलेला, प्रतिगामी, इत्यादी" विशेषणांनी गौरवले असतं. आणि ही मी केवळ छापता येण्याजोगी दूषणं सांगितली आहेत. मात्र आता सर्व काही सूर्यप्रकाशाइतकं स्वच्छ झालं आहे. सत्य काय आहे ते प्रत्यक्ष पंताप्रधान मनमोहन सिंग ह्यांनी एका भाषणात कबूल केलं आहे. "अल्पसंख्यांकांना प्राधान्य".
एकोणसाठ वर्षांच्या स्वातंत्र्यावर एका फटक्यात बोळा फिरवला गेला. १९४७च्या आधी १००० वर्षं आपण ज्या स्थितीत होतो तिथेच पुन्हा पोहोचलो - आपल्याच देशात दुय्यम स्थानी, असे गुलाम ज्यांची सत्ताधाऱ्यांना काडीचीही पर्वा नाही. पुन्हा एकदा आपण औरंगज़ेबाच्या, जिझिया कराच्या काळात पोहोचलो. पुन्हा एकदा ह्या भारतवर्षात हिंदूच्या जन्माला येणे हा गुन्हा ठरला.
चूकही पुन्हा एकदा आपलीच आहे. इतिहासापासून काहीही न शिकण्याचा जणू आपण विडाच उचलला आहे. आपणच एक अशी सरकार निवडून दिली जिची खरी सत्ताधीश आहे एक विदेशी कॅथोलिक, नाममात्र पंतप्रधान आहे सिख आणि शोभेचा राष्ट्रपती आहे मुसलमान. आणि हा सारा डोलारा उभा केला डाव्यांच्या टेकूवर. ह्यात आम्हाला साक्षात्कार झाला आमच्या 'सर्वधर्मसमभावाचा', आमच्या 'सर्वसमावेशक संस्कृतीचा', आमच्या 'वसुधैव कुटुंबकम्' छाप उदात्ततेचा. भ्रमाचा भोपळाच तो, कधीतरी फुटायचाच. मनमोहन सिंगांच्या हस्ते ( की मुखे) हे शुभकार्य पार पडलं. आम्ही सिद्ध केलं की आम्ही आमच्या भूमीवर झालेल्या अनेकानेक मुसलमान आक्रमणांपासून, कैक शतकांच्या परकीय जुलुमी राजवटीपासून, मीर जाफ़र आणि प्लासीपासून काहीच धडे घेतलेले नाहीत. सिद्ध केलं की आपणच आपले सगळ्यात मोठे शत्रू आहोत. आपल्या भ्याडपणामुळे, आपल्या गप्प बसण्यामुळेच आज मनमोहन सिंग त्यांचा व त्यांच्या सरकारचा आजवर छुपा असलेला हा बहुसंख्यांक-विरोधी कार्यक्रम, हा हेतू आता बिनधास्त, उघडपणे बोलू लागले आहेत.
त्यांच्या ह्या वक्तव्यापेक्षाही भयावह आहे त्याला (न) मिळालेली प्रसिद्धी. समस्त मिडियानं अळी मिळी गुप चिळी धारण केली आहे. एरवी 'ब्रेकींग ' बातम्यांच्या सदैव वासावर असणाऱ्या खाजगी वाहिन्यांनी ही स्फोटक बातमी मात्र दोन-तीन वाक्यात आटोपली. बरोबरच आहे म्हणा. नट-नट्यांच्या खुमासदार बातम्यांतून त्यांना वेळ मिळेल तेव्हा ना! वर्तमानपत्रांची तीच तऱ्हा. DNA ची पहिल्या पानावरची सर्वात मोठी बातमी होती कंपन्यांना चांगले CEO कसे मिळत नाहीत ह्याची. पंतप्रधानमजकूरांचा हा बॉंब पान क्रमांक सातच्या एका कोपऱ्यात दडवला होता.
वाहिन्यांकडे गंभीर विषयांसाठी वेळ नाही. वृत्तपत्रं एकतर डाव्या संपादकांच्या हातात तरी आहेत किंवा सरकारधार्जिणी तरी. आपल्या हातात फक्त इंटरनेटचे महाजाल आणि ब्लॉग-विश्व आहेत. निदान इथेतरी आवाज उठवूया. अन्यथा तो कायमचा बंद होईल.
No comments:
Post a Comment