Monday, October 30, 2006

पूल


निर्जन पूल
Originally uploaded by Milind9.
एक निर्जन, धुक्यात लपेटलेला पूल. वेळ तिन्हीसांजेची की पहाटेची कळत नाही. विषण्ण, उदास वातावरण, काहीसं नीट न आठवणाऱ्या स्वप्नासारखं ज्यात मी एकटा, एकाकी असतो. भोवती माणसं शोधत असतो अयशस्वीपणे, वेड्यासारखा. कोंडणाऱ्या धुक्यात जीव गुदमरत असतो. ओरडायचे असते पण शब्दही फुटत नाही. छातीवर जणू मणामणाचे वजन असते. आणि अचानक धापा टाकत, घामाने चिंब भिजलेल्या अवस्थेत जाग येते.

ता. क. हे छायाचित्र मी काढलेलं नाही, जालभ्रमणादरम्यान मला सापडलेले आहे.

No comments:

Post a Comment