Wednesday, September 26, 2007

झाडे एकमेकांशी बोलतात

हॊलंडमधील नायमेहन शहरात असलेल्या रॅदबौद विश्वविद्यालयाच्या डॊ. जोसेफ स्टुफर यांच्या संशोधनानुसार झाडे एकमेकांशी बोलतात. 'बोलतात' हा शब्द तितकासा बरोबर नाही, माहितीची देवाण-घेवाण करतात असे म्हणूया. आजवर झाडांची प्रतिमा ही नैसर्गिक मृत्यू येईपर्यंत, कापली जाईपर्यंत वा खाल्ली जाईपर्यंत एका ठिकाणी निष्क्रीयपणे उभी राहणारी वनस्पती अशी होती. आता मात्र यावर पुनर्विचार करावा लागणार आहे. डॊ.स्टुफरांच्या मते स्ट्रॊबेरी, क्लोवर, ग्राऊन्ड एल्डर इत्यादी झाडे नेटवर्क बनवतात.
त्या संपर्कव्यवस्थेद्वारे शत्रुंबद्दल दुसऱ्यांना माहिती पुरवतात. उदाहरणार्थ, एका झाडावर जर काही किड्यांनी हल्ला केला तर नेटवर्कमधून ते इतरांना त्याची माहिती पोहोचवते. ही आगाऊ सुचना मिळाल्यावर बाकीची झाडे आपली अंतर्गत रासायनिक सुरक्षा-व्यवस्था अधिक बळकट व येणाऱ्या हल्लेखोरास योग्य अशी करतात. परंतु वायरसेस्‌ मात्र झाड्यांच्या या नेटवर्कचा फायदा घेऊन एका झाडातून दुसऱ्या झाडात सहजपणे पसरतात. (म्हणजेच नेटवर्कींगचे जसे फायदे असतात तसेच तोटेही असतात! जरा जपून.)
ही आश्चर्यकारक माहिती
मला जालभ्रमण करत असताना इथे मिळाली.

2 comments:

  1. फारच इण्टरेस्टिंग माहिती आहे मिलिंद, इथे शेअर केल्याबद्दल धन्यवाद!

    स्पेलिंग तसे दिसत असले तरी ते डच भाषेत असल्याने उच्चार "नायमेहन" आणि "रॅदबौद" असे आहेत. अतिशय सुंदर आणि टुमदार गाव आहे ते. ६ वर्षे त्याच गावी राहिलेलो असल्याने अनेक आठवणी निगडित आहेत. :)

    ReplyDelete
  2. @ अभिजीत :
    धन्यवाद, अभिजीत. आपल्या सुचनेनुसार योग्य बदल केलेले आहेत.

    -मिलिंद

    ReplyDelete