हल्ली मुंबईची शांघई करण्याच्या गप्पा - की वल्गना - वारंवार ऐकू येतात. कानाला गोड लागतं, डोळ्यांत रम्य स्वप्नं तरळू लागतात, ओठांवर 'तथास्तु' येतं - आणि तेव्हढ्यात हे चित्र पाहायला मिळतं:

मुंबईच्या कुर्ला उपनगराचे हे चित्र अधिक परिणामकारकपणे त्याच्या मूळ आकारात
इथे पहा.
तुलनेसाठी शांघईची ही स्कायलाईन (मराठी प्रतिशब्द?) पहा :
"सारे जहां से अच्छा..."
मिलिंदराव, तुलना तुलनात्मक गोष्टींची होते...शांघायचा व्यावसायिक भाग आणि कुर्ल्याच्या झोपड्या एकाच मापाने मोजताय आपण...
ReplyDeleteराणीच्या हाराशी तरी तुलना करायची नाहीतर शांघायच्या झोपडपट्टीशी तरी...
@ xetropulsar : तुलना शांघायच्या स्कायलाईनची व कुर्ल्याच्या झोपडपट्टीची नसून राजकीय इच्छाशक्तीची व वेळप्रसंगी लोकानुनय सोडून गरजेचे कठोर निर्णय घेण्याची तयारी असण्या/नसण्याची आहे. भ्रष्ट व्यवस्था व एकगठ्ठा मतांसाठी जनहिताला मूठमाती देणारे राजकारणी यांच्या मगरमिठीत सापडलेल्या आमच्या असहाय्य शहराला कधीही पूर्ण न होऊ शकणारी स्वप्नं दाखवणं हे आम्हा मुंबईकरांच्या जखमांवर मिठ चोळण्यासारखं आहे.आणि राणीच्या हाराचं म्हणाल तर दुरून डोंगर साजरे!
ReplyDeletea picture is worth thousand words he vaky paTaave ashee hee don chhaayachitre ahet.
ReplyDelete