डिग्स्बी हा सध्या लोकप्रिय असलेला IM (इन्स्टंट मेसेंजर) क्लायंट प्रोग्रॅम आहे. आकर्षक रूपडे असल्याने, एकाच वेळी गूगल टॉक, याहू मेसेंजर इत्यादी बर्याच चॅटना जोडून देत असल्याने, आणि फुकट असल्याने डिग्स्बीचा अल्पावधीत खूप प्रसार झाला. मात्र संगणकावर स्थापण्याच्या प्रक्रियेदरम्यान हा स्वत:बरोबरच इतर तब्बल सहा क्रॅपवेअर स्थापन करण्याचा प्रयत्न करतो. ह्या विषयी माहिती इथे व इथे पाहा. इन्स्टॉल करताना डिग्स्बी याहू टुलबार, मायफ्रीझ नेट असिस्टंट फॉर फायरफॉक्स, स्मार्टशॉपर, वेदरबग, रेगिस्ट्री पॉवर क्लीनर इत्यादी स्थापन करण्याच्या ’स्पेशल ऑफर’चे पर्याय देतो. आपण लक्ष न देता किंवा घाईत ’Accept' वर टिचकी मारत गेलो तर हे सारे अनावश्यक क्रॅपवेअर आपल्या संगणकावर टाकले जाईल. याहून वाईट गोष्ट म्हणजे आपल्याला अंधारात ठेवून डिग्स्बी प्रोग्रॅम आपल्या संगणकाचा CPU आणि बॅन्डविड्थ ’रिसर्च’ साठी वापरतो. ही माहिती त्यांच्या टर्म्स ऑफ सर्विस मध्ये दडवलेली आहे. किती जण TOS वाचतात? ह्या ’रिसर्च’मध्ये मार्केटिंग रिसर्चही अंतर्भूत आहे, व TOS मध्ये "...including but not limited to..." ची पळवाट ठेवलेली आहेच, जेणेकरून त्यांना तुमच्या बॅन्डविड्थचा उपयोग अक्षरश: कशासाठीही करता येईल. आपला संगणक आपल्या परवानगीशिवाय, आपल्याला न कळवता कोणीतरी वापरत आहे किंवा वापरू शकतो ही कल्पना किती भयावह आहे! हा अनधिकृत वापर तुम्हाला बंद करायचा असल्यास मेनू मध्ये जाऊन ’डिग्स्बी’-’सपोर्ट दिग्स्बी’-’हेल्प डिग्स्बी कंडक्ट रिसर्च’ बंद करावे लागेल.
डिग्स्बी वापरणार्यांनी आणि वापरण्याच्या विचारात असलेल्यांनी हे कळल्यानंतर पुनर्विचार करावा आणि एखादा पर्यायी सुरक्षित प्रोग्रॅम (उदा. Pidgin ही मुक्तस्रोत प्रणाली) वापरावा.
खरं आहे, डिग्जबी बद्दल बर्याच तक्रारी ऎकू येत आहेत. मागे मी ही डिग्जबी वापरत होते...पण त्यात युनिकोड सपोर्ट नाही म्हणून नाद सोडून दिला. तसे ट्रिलियन ऍस्ट्रा पण चांगले आहे. मात्र पूर्वी त्यात जीमेल सपोर्ट नव्हता...आता आहे. तेच वापरावे. युनिकोड सपोर्टही आहे म्हणे आता.
ReplyDelete