Saturday, July 21, 2007

दु:खद निधन

खालील नोंद ही मनोगतच्या सदस्यांकरता व वाचकांकरता आहे. इतरांना त्यातील संदर्भ लागणार नाहीत.

हा प्रतिसाद/ हे निवेदन मनोगतच्या आपापसात या विभागात आज सकाळी दिले होते. प्रशासकांनी ते अद्याप, म्हणजे तब्बल १२ तासांनंतरही प्रकाशित केलेले नाही त्या अर्थी ते प्रकाशित होण्याची शक्यता कमी आहे. सबब ते आता किंचित फेरफार करून इथे अनुदिनीवर प्रकाशीत करत आहे.

दु:खद निधन

१) उत्तर
हेडमास्तर द्रोणाचार्यांनी अर्जुनाला खूश करण्यासाठी छाटलेला अजून एका एकलव्याचा अंगठा.

२) महमदा रे
जातीय वैमनस्य वाढू नये व महमद हे नाव धारण करणाऱ्या जगातील लाखो सत्पुरुषांना वाईट वाटू नये या स्तुत्य हेतूने महमदा रे ला नाईलाजाने देहान्त प्रायश्चित्त देण्यात आलेले आहे. मात्र हा नियम राम, कृष्ण, शंकर इत्यादी नावांना लागू होणार नाही याची नोंद घ्यावी.

३) समान न्याय तत्त्व
ह्या तत्त्वाचे पालन केल्यास देश, शासन, सहकारी संस्था, खाजगी कंपन्या, विश्वविद्यालये, महाविद्यालये, शाळा, व संकेतस्थळे चालवण्यात येत असलेल्या व्यावहारिक अडचणी लक्षात घेऊन समान न्याय तत्त्व याला अत्यंत नाइलाजाने व खेदाने मूठमाती द्यावी लागली आहे.

४) तारतम्य

ईश्वर साऱ्या मृतात्म्यांस सद्गती देवो. समस्त मनोगतींनी दोन मिनिटांची शांतता राखून मयतांना श्रद्धांजली वाहावी ही नम्र विनंती.

॥ॐ शांति: शांति: शांति: ॥

No comments:

Post a Comment