Sunday, March 25, 2007

राजाचं वस्त्रहरण

आपलं म्हणणं खरं ठरलेलं पाहून कोणाला आनंद होणार नाही? तरीही कधी कधी आपण खोटं पडावं असं फार फार वाटतं. वानगीदाखल मी सचिन तेंडुलकरविषयी इथेइथे लिहिलं आहे ते घ्या. निदान विश्व-चषकात तरी सचिनने माझे शब्द माझ्या घशात घालावे अशी इच्छा होती. पण तसं होणं नियतीस मंजूर नव्हतं. पुन्हा एकदा उमर खय्यामच्या शब्दांचा यथार्थतेची प्रचीती आली :

"The Moving Finger writes; and, having writ,
Moves on: nor all your Piety nor Wit
Shall lure it back to cancel half a Line,
Nor all your Tears wash out a Word of it"


निर्दय काळाने सचिनच्या कारकीर्दीची भैरवी कधीच गायली आहे. ती त्याच्या कानापर्यंत केव्हा पोहोचते ते पाहूया.

1 comment:

  1. Just to inform you that your blog has been added into Marathi Blogs aggregator - MarathiBlogs.com. I would appreciate if you can give us a link back. Also please let us know your opinion about it.

    -- Punit

    ReplyDelete